मुंबई प्रतिनिधी
शिवसेना वरली विधानसभा वर्धापन दिन नुकताच दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत
५० अपंग बांधवांना व्हिलचेअर वाटप करण्यात आले. तसेच २५ अंध बांधवांना आधारकार्डसह आर्थिक मदत देण्यात आली. ५० डायलिसिस रुग्णांना एक वर्षासाठी वैद्यकीय मदत देण्यात आली. ५० ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी एक वर्षाची आर्थिक मदत देण्यात आली.
तसेच ‘वारसा संस्कृतीचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.आम्ही नेहमीच समाजोपयोगी उपक्रम घेत असतो त्याचच एक भाग म्हणून आम्ही या वर्धापनदिन निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम घेतले असल्याची माहिती माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यानी दिली
सदरप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, आमदार प्रकाश सुर्वे , आमदार मुरजी पटेल , आमदार मनीषाताई कायंदे, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, माजी आमदार यामिनीताई जाधव, उपनेत्या शितलताई मात्रे, कलाताई शिंदे, आशाताई मामेडी, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राहुल लोंढे साहेब, महिला विभागप्रमुख प्रियाताई सरवणकर, श्रद्धाताई उले, सायना एन.सी., नगरसेवक संतोष खरात साहेब, भायखळा महिला विधानसभा प्रमुख वंदनाताई गवळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच शिवसेनेचे सर्व महिला,पुरुष, युवा,युवती पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.








