मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वडाळा येथे गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांना शेअर केले. आम्ही नेहमीच शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी आम्ही शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यापुढे देखील आम्ही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती भाजपा वडाळा विधानसभा मंडळ अध्यक्ष संदीप पानसंडे यांनी दिली. या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोंढा, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्ष निरज उभारे,माजी जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर उपस्थित होते








