केतन खेडेकर
स्थानीय लोकाधिकार महासंघाचे उपाध्यक्ष आणि नेवल डॉकयार्ड चे कर्मचारी देवेंद्र कदम यांच्यात कामगाराप्रति काम करण्याची क्षमता फार मोठी आहे असे जाहीर प्रतिपादन माजी खासदार, कानिया लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी कदम यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन नुकतेच सीएसटी येथील तेलारखान सभागृह नौसेना गोदीवाडा येथे केले होते. या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले
देवा कदम यांना कामगारांप्रती असलेल्या एखाद्या मोहिमेवर पाठवले तर त्यांनी ती मोहीम फत्ते केली म्हणूनच समजा. यात तीळमात्र शंका नसायची. परंतु आज देवा कदम शासनाने ठरवलेल्या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तरी ते आता दुसऱ्या इनिंगसाठी तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता झोकून कामगारांसाठी काम करायला तयार राहिले पाहिजे. आज कामगारांवर काळया कायद्याचे फार मोठे संकट आहे. फिक्स टाईम पद्धत आणि कंत्राटीकरण यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. त्यामुळे आपल्याला फार मोठा लढा येणाऱ्या काळात उभा करायचा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन लढले पाहिजे आणि कामगारांचा हक्क परत मिळवला पाहिजे. आज महाराष्ट्र दिन कामगार दिन असून मी सर्व कामगार बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
खासदार गजानन कीर्तीकरांमुळेच आम्ही लढवय्ये झालो
कामगार क्षेत्रात काम करत असताना व्यवस्थापना बरोबर तडजोड कशी करावी कधी पुढे जावे आणि कधी मागे यावे याबाबत वेळोवेळी लढवय्या भूमिका कशी घ्यावी हे सर्व आम्ही गजानन कीर्तीकरांमुळेच शिकलो आणि लढवय्ये झालो. प्रत्येक कामगाराची विचारपूस करून त्याच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे काम गजाभाऊ नेहमीच करत असतात. असा कोणताही दिवस नाही की भाऊ काम करताना आम्ही पाहिले नाही. भाऊंचे वय 84 असून देखील ते या वयात अगदी हिरीरीने काम करतात आणि कामगारांचे प्रश्न सोडवतात हे फार वाखाणण्याजोगे आहे. गजा भाऊंना आई भवानी उदंड आयुष्य देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे जाहीर प्रतिपादन नेवल डॉकयार्ड सेवेतून निवृत्ती झाल्यावर देवेंद्र कदम यांनी केले. या समारंभात देवा कदम यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव, स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे,
उपाध्यक्ष शिवप्रसाद भामरे, रवि विचारे, दिपक काळींगण ,
चिटणीस संतोष बामणे, विजय परब, सचिन कदम, खजिनदार मिलिंद पंडित,चिटणीस संतोष बामणे, कदम यांचे कुटुंबीय, मित्र मंडळी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ब्रेकिंग बातम्या देवेंद्र कदम यांच्यामध्ये कामगारांसाठी काम करण्याची क्षमता मोठी आहेमाजी खासदार गजानन कीर्तिकर








