Home ब्रेकिंग बातम्या काळाचौकी येथील सायबर क्राइम व्याख्यानाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काळाचौकी येथील सायबर क्राइम व्याख्यानाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0


मुंबई प्रतिनिधी
शिवाजी विद्यालय आणि अभ्युदयकट्टा या संयुक्त अभियानाच्या वतीने आयोजित पहिल्याच कार्यक्रमात एका संवेदनशील ज्वलंत  *सायबरक्राईम* या विषयावर पोलिस उपनिरीक्षक नितीन हेम्बाडे यांनी शिवाजी विद्यालय,अभ्युदय नगर, काळाचौकी येथे प्रात्यक्षिक सांगून व्याख्यान दिले.या व्याख्यानाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय गोविलकर,डॉ जगन्नाथराव हेगडे डॉ किशोर खुशाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हेम्बाडे सर आपल्या भाषणात म्हणाले “मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे.जेवढा उपयोग आहे तेवढाच धोका सुद्धा आहे. अनेक प्रलोभने या माध्यमातून तरुणाईला खुणावतात,ज्येष्ठांना फसवतात.फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे,अनेक तक्रारी दररोज पोलिस ठाण्यात येत असतात.अनेक लग्न मोडतात, धमक्या देऊन पैसे उकळले जातात, शारीरिक अत्याचार केले जातात त्याचे व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करून पुन्हा पुन्हा लुटलं जातं अनेक संसार उध्वस्त झालेत.ज्यांच्यावर प्रसंग आलेत ते उघडपणे सांगू शकत नाहीत आणि सहनही करू शकत नाहीत. आणि प्रकरण सहनशक्तीच्या पलीकडे गेले  की आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो.खूप भयंकर स्थिती आहे .
ह्याला आळा घालायचा असेल तर सोशल मिडिया वरील साक्षरता निर्माण करायला हवी.
अशा या पद्धतीने ऑनर किलिंगचे अनेक किस्से हेम्बाडे सरांनी सांगीतले अनेक तरुणी बळी गेल्यात,अनेक युवक गुपचूपपणे सहन करत आहेत जेष्ठ अनाहुत पणे लुटले जात आहेत हे कुठे तरी थांबायला हवे म्हणून पोलिस खाते लोकांनी सतर्क रहावे म्हणून असे जनप्रबोधनाचे कार्यक्रम करत असते”.
शिवाजी शाळा आणि  अभ्युदयकट्टा च्या अधिराज लोकेगावकर आणि शेखर छत्रे यांचे मी या सामाजिक अभियानासाठी कौतुक करतो असे गौरवोद्गार  पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांनी  कट्ट्याला शुभेच्छा देताना काढले.
या कार्यक्रमासाठी सामाजिक जाण असलेला श्रोतृवर्ग लाभला होता. पोलिस निरीक्षक  नंदकिशोर माने,पत्रकार कैलास कोरडे,स्मिता चौधरी,अलका सपकाळे,संजय नागरे, उदय पवार,बाळा तुळसकर,वसंत यादव, दिव्या घाडीगांवकर,महेंद्र सातपुते,मनोहर खानविलकर,गणेश आणि राजेंद्र कोचरेकर,राजेश कांबळे, अनिल वाघमारे,प्रमोद परब,सीमा खाडे, भरत सुगदरे, नंदा म्हस्के, विनोद साळवी,जयेश मेहता, विजय निरगुडकर आणि सामाजिक बांधिलकी जाणणारे सन्माननीय नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुंदर असे  सूत्रसंचालन कट्ट्याच्या सोनल खानोलकर यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमासाठी  ज्योती राणे,संतोष(बाळा)परब,मॅडम,मनोहर पेडणेकर,यांनी विशेष मेहनत घेतली
नवनवीन संकल्पना घेऊन हा कट्टा प्रत्येक महिन्याला आपल्या सामाजिक जाणीव अधिकाधिक प्रगल्भ करेल अशी ग्वाही अधिराज लोकेगावकर यांनी या कार्यक्रमात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here