केतन खेडेकर
हिंदुहृदयसम्राट समृद्धी महामार्गवर सतत अपघातात वाढ होत असल्याने शासनाने त्वरित उपाययोजना करण्याबाबत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी द्वारे आपला प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडला. त्यावर
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सन-२०२३ ते माहे ऑक्टोंबर, २०२५ यादरम्यान झालेल्या ४२५ अपघातांपैकी २८८ अपघात प्राणांतीक स्वरुपाचे असून त्यामध्ये एकूण ४०५ व्यक्तींचा दुर्देवी मृत्यु झालेला आहे. सदर अपघात विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालकास झोप लागणे (Road) Hypnosis), वाहनांचे टायर फुटणे, वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकिंग करणे, लेन शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, तसेच ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हर सतर्क नसणे, वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड असणे, व्यसन करून वाहन चालविणे, मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे, वाहतूक नियमाचे पालन न करणे, इत्यादी कारणांमुळे झालेले आहेत.
समृध्दी महामार्ग हा IRC मानकामधील मार्गदर्शक तत्वानुसार संकल्पित करण्यात आलेला आहे. गृह विभागाच्या दिनांक ०४.१०.२०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार या महामार्गासाठी स्वतंत्रपणे वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार या महामार्गावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या वाहनांची वेगमर्यादा दर्शक फलके लावण्यात आली आहेत. समृध्दी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, कॅटआईज व डेलिनेटर्स, रम्बलिंग स्ट्रीप्स लावणे इ. उपाययोजना केलेल्या आहेत. बहुतांश ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूने Row वर संरक्षक भिंत उभारण्यात आलेली आहे. तसेच वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून काही ठिकाणी क्रॅश बॅरीअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत समृध्दी महामार्गावरील सुरक्षिततेच्या अनुषंगाने व अपघात ग्रस्तांना तातडीने सहाय्य करणेसाठी महामार्गावर अत्याधुनिक शिघ्र प्रतिसाद वाहने-२१ नग (या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी फायर फायटिंग, हायड्रॉलिक जॅक, कटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, सिस्टिम इ. प्रथमोपचार सुविधांची सोय करण्यात आली आहे.), रुग्णवाहिका २१ नग, गस्त वाहने १६, महामार्ग सुरक्षा पोलिस केंद्रे- १५, ३० टन क्षमतेची क्रेन-१६, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १९२ सुरक्षारक्षक इत्यादी सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत. शिवाय महामार्ग सुरक्षा पोलीसांना महामंडळामार्फत १५ वाहने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. तसेच तैनात असलेल्या २१ रुग्णवाहिका आपत्कालीन क्रमांक १०८ शी (आपत्कालीन वैद्यकीय सेवा, महाराष्ट्र राज्य) जोडलेल्या आहेत.
या व्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (१०८) जिल्हानिहाय अहमदनगर-४०, अमरावती-३१, संभाजीनगर-३१. बुलढाणा-२३, जालना-१५, नागपूर-४०, नाशिक-४६, ठाणे-३९, वर्धा-११, वाशिम-११ अशा एकूण २८७ रूग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शीघ्र प्रतिसाद वाहने, तसेच रुग्णवाहिका, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षक अपघात स्थळी जाऊन अपघाताच्या तीव्रतेप्रमाणे उपाययोजना हाती घेतात आणि रुग्णांची योग्य ती सोय करतात. आपत्कालीन उपाययोजना म्हणून महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्र. १८०० २३३ २२३३ व ८१८१८१८१५५ दर्शविणारे फलक लावण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली.
Home ब्रेकिंग बातम्या समृद्धी महामार्गावर अपघातात वाढ होत असल्याने शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात आमदार मिलिंद...








