Home ब्रेकिंग बातम्या जी/उत्तर विभागातील घ.क.व्य. खात्याच्या चुकीच्या कारभारामुळे म.न.पा. प्रशासनाची होतेय नाहक बदनामी

जी/उत्तर विभागातील घ.क.व्य. खात्याच्या चुकीच्या कारभारामुळे म.न.पा. प्रशासनाची होतेय नाहक बदनामी

0


मुंबई प्रतिनिधी
जी/उत्तर विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक हे गर्दुल्ले यांच्याकडून महापालिका कामगारांचे काम करुन घेत असल्याबाबत पुराव्यासहित प्रसारित करण्यात आले असल्याने  याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने केली आहे.
कनिष्ठ पर्यवेक्षक श्रीमती राधिका अहिरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये कामगारांचे आर्थिक नुकसान करीत असल्याबाबत तसेच कामगार वर्गाशी संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक उध्दट वागणे, काम न करता घरी जाणे, अशा अनेक तक्रारी आम्हास तसेच प्रशासनाला कामगार व लोकप्रतिनिधी यांनी करुन सुध्दा काही फरक पडत नाही. अशा आशयाची बातमी विविध यू ट्यूब चॅनलवर बातमी प्रसारित झाली आहे. याबाबत संबंधित अधिकारी वर्गाची तात्काळ चौकशी लावण्यात यावी. जेणेकरुन भविष्यात अशा घटना घडणार नाही व महापालिका घ.क.व्य खात्याची प्रतिमा मलीन होणार नाही.
याबाबत आपणांस आम्ही वारंवार मागणी करीत आहोत, कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या बदल्या ३ वर्षांनी कराव्यात असे आशयाचे परिपत्रक असूनही बदल्या केल्या जात नाही. सदर विभागामध्ये ५-५ वर्षे कनिष्ठ पर्यवेक्षकांची वॉर्डमधील चौकी सुध्दा बदली होत नाही. मुकादमांच्या सुध्दा बदल्या इतर चौक्यांवर केल्या जात नाहीत. या संपूर्ण चुकीचे धोरण स्थानिक अधिकारी राबवत आहेत. यामागे मोठे आर्थिक धोरण असल्याची चर्चा होत आहे. सदर विषयाची आपण तातडीने चौकशी लावावी तसेच सदर विषयावर तातडीने बैठकीचे आयोजन करुन, बैठकीची तारीख व वेळ आम्हास लेखी स्वरुपात कळवावी अशी मागणी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी प्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन यांना पत्र लिहून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here