मुंबई :
शिवनेरी विकास महिला मंडळाच्या वतीने विक्रोळीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिलभाऊ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात करण्यात आला.त्याप्रसंगी शिवसेना उबाठा महिला उपशाखा संघटक लिना सूर्यवंशी, मंडळाच्या कार्याध्यक्ष नयन पानसरे,ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे,मंडळाच्या खजिनदार मंजू जगताप, मंडळाच्या अध्यक्षा व माजी शिवसेना महिला शाखाप्रमुख अहिल्या थोरवे, माजी महिला शिवसेना उपशाखाप्रमुख रत्नमाला सूर्यवंशी उपस्थित होते. विक्रोळी विधानसभा संघटक शंकर ऊर्फ नाना ढमाले मंडळाचे सल्लागार आहेत. दरम्यान आमदार सुनिलभाऊ राऊत यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसैनिकांच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राऊत यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विक्रोळी मतदार संघातील शाखा निहाय दौरे आयोजित केले आहेत.दर सोमवारी शाखा नं.११८ कन्नमवार, मंगळवारी शाखा नं.११९ टागोरनगर, बुधवारी शाखा नं
१२० सुर्यनगर,गुरुवारी शाखा नं. १२२ पवई तर शुक्रवारी शाखा नं.११७ कांजूरमार्ग येथे आमदार सुनिलभाऊ राऊत रात्री ८ ते १० वाजता उपस्थित राहून जनतेची गार्हाणी ऐकणार आहेत.त्यांच्या या उपक्रमाने आमदार सुनिलभाऊ राऊत यांचा जनतेशी थेट संवाद होत आहे.विक्रोळीचे प्रश्न सुटणार आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.








