Home ब्रेकिंग बातम्या
0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. हे आपल्याला माहीत आहे. परंतु आता त्यांचा असा एक जबरा फॅन समोर आला आहे. ज्याने आपल्या एका कृतीमधून सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या एकनाथ शिंदेंचा हा चाहता सोशल मीडियासह मीडियावर चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसत आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आलेल्या या त्यांच्या अजय मोहिते या वर्धाहून आलेल्या चाहत्याने पुष्पा चित्रपटातील हिरोसारखी हुबेहुब वेशभुषा केली होती.यावेळी शिंदेंच्या या चाहत्याने मीडियाला फोटोही काढू दिले. तसेच, आपण मराठी माणूस आहे मराठीतच बोला, असंही या चाहत्याने सांगितलं. तर त्या ठिकाणी हजर काहीजणांनी या पुष्पासोबतही फोटो काढून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here