Home ब्रेकिंग बातम्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मुंबई प्रतिनिधी 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भायखळा विधानसभेच्या वतीने मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी उपशाखाप्रमुख, गटप्रमुख (महिला/पुरुष) *निर्धार मेळावा* याचे आयोजन करण्यात आले होते. सदर निर्धार मेळाव्यास शिवसेना नेते तसेच, खासदार व पूर्व केंद्रीय मंत्री सन्मा. श्री अरविंदजी सावंत, शिवसेना उपनेते पूर्व आमदार आणि भायखळा विधानसभा निरीक्षक सन्मा. श्री अशोक धात्रक व शिवसेना उपनेते व भायखळा विधानसभेचे आमदार सन्मा. श्री मनोज जामसुतकर यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. सदर मेळाव्यास शिवसेना उपनेत्या तसेच महिला विभाग संघटिका, मा. महापौर सन्मा सौ. किशोरीताई पेडणेकर, शिवसेना सचिव सन्मा. श्री सुरज चव्हाण, सन्मा. श्री सुधीर (भाऊ) साळवी, शिवसेना समन्वयक (पश्चिम महाराष्ट्र) सन्मा. श्री दगडू (दादा) सकपाळ, आमदार (शिवडी विधानसभा) सन्मा. श्री अजय चौधरी, विभागप्रमुख सन्मा. श्री आशिष चेंबूरकर
इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच भायखळा विधानसभेतील विधानसभा समन्वयक सन्मा. श्री. बबन गांवकर विधानसभा संघटक सन्मा. श्री. मंगेश बनसोड, उपविभाग प्रमुख सन्मा. श्री राम सावंत, श्री. विजय कामतेकर प्रभाग क्र. २०८ चे नगरसेवक रमाकांत रहाटे, प्रभाग क्र. २१० च्या नगरसेविका / म. उपविभाग संघटक सौ. सोनम जामसुतकर, महिला विधानसभा समन्वयक सन्मा. सौ. सुरेखा राऊत, महिला विधानसभा संघटक सन्मा. सौ चंदना साळुंखे, महिला उपविभाग संघटिका सन्मा. सौ कीर्ती शिंदे व सर्व शिवसेना भायखळा विधानसभेचे महिला – पुरुष सन्मा. सहसंघटक, शाखाप्रमुख, म. शाखा संघटक, महिला – पुरुष शाखा समन्वयक, युवासेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, उपशाखाप्रमुख – म. उपशाखा संघटक, गटप्रमुख व माजी पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भायखळा विधानसभेतील सर्व जागांवर नगरसेवक निवडून आणून त्या प्रभागांवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. सदर मेळावा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here