Home ब्रेकिंग बातम्या *भगव्याचे वादळ, विकासाचा ध्यास आणि जनतेच्या विश्वासाचा बुलंद आवाज!*

*भगव्याचे वादळ, विकासाचा ध्यास आणि जनतेच्या विश्वासाचा बुलंद आवाज!*

0


*अनाथांचे नाथ-मदतीचा हात-लोकनाथ ना. एकनाथ शिंदे* : *संघर्षातून घडलेले नेतृत्व, महिला सक्षमीकरणाचे पर्व, युवकांचा आधारवड आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील

✍🏾 *दिनेश शिंदे*
बी. कॉम., आयईएमबीए
(युबीआय – युरोप)
*शिवसेना राष्ट्रीय सह समन्वयक एवं मिडिया समन्वयक*

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याने, संघर्षाने आणि निर्णयक्षमतेने स्वतंत्र ठसा उमटवतात. काही नेते विचारांचे प्रतिनिधित्व करतात, काही संघटनांची ताकद बनतात, तर काही आपल्या राजकीय प्रवासातून जनतेशी भावनिक नाते निर्माण करतात. या तिन्ही वैशिष्ट्यांचा त्रिवेणी संगम आपल्या नेतृत्वात घडविणारे लोकप्रिय नाव म्हणजे *ना. एकनाथ संभाजी शिंदे*!

*भगव्या झेंड्याची अस्मिता, वाघाची दहा दिशांना आसमंतात घुमणारी डरकाळी, हिंदुत्वाचा बुलंद विचार, शिवसेनेच्या संघटनात्मक परंपरेचा वारसा, विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची वृत्ती या विविध पैलूंनी त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व घडले आहे.*

विशेष म्हणजे, राजकारणातील संघर्ष आणि सत्तेतील चढ-उतार यांना सामोरे जात असतानाच महिला, भगिनी, विद्यार्थिनी, कन्या, युवक, शेतकरी आणि सामान्य कुटुंबांच्या अपेक्षांशी जोडले जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभाराची धुरा सांभाळताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामाजिक विकासाचा अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात दिसून आला.

राजकारणात सत्ता मिळवणे ही एक उपलब्धी असते; पण समाजातील विविध घटकांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणे ही नेतृत्वाची खरी कसोटी असते. *ना. एकनाथ शिंदे* यांच्या राजकीय प्रवासाचे वैशिष्ट्य याच दोन गोष्टींच्या संगमात दडलेले आहे.

*संघर्षातून घडलेले नेतृत्व : शाखाप्रमुख ते राज्याचे नेतृत्व*!

*ना. एकनाथ शिंदे* यांचा राजकीय प्रवास हा सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वोच्च राजकीय जबाबदारीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. सातारा जिल्ह्यातील दरेगावच्या मातीतून आलेल्या या नेतृत्वाने ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या, कामगारांचे प्रश्न, नागरी सुविधांची आवश्यकता आणि सर्वसामान्यांच्या अडचणी यांच्याशी जवळीक साधली. नगरसेवक, सभागृहनेते, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास घडला.

या वाटचालीत *शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे* यांच्या कार्यशैलीचा प्रभाव त्यांच्या राजकीय जडणघडणीत महत्त्वाचा ठरला.

संघटननिष्ठा, कार्यकर्त्यांशी जवळीक, आक्रमक राजकीय भूमिका आणि निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये बनली.

२०२२ मधील शिवसेनेतील ऐतिहासिक राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवली. या संघर्षातून त्यांनी स्वतंत्र राजकीय नेतृत्व प्रस्थापित केले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून राज्यकारभार केला आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व करून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीला ऐतिहासिक प्राप्त करून देऊनसुद्धा उपमुख्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारून ती यशस्वीपणे सांभाळत देखील आहेत.

राजकीय वादळात स्वतःचे स्थान टिकवून ठेवणे, सहकाऱ्यांना एकत्र आणणे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत नवी दिशा शोधणे ही त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

*भगवे वादळ आणि वाघाची डरकाळी*:*शिवसेनेच्या अस्मितेचा बुलंद आवाज!*

*शिवसेना म्हणजे केवळ एक राजकीय पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक प्रभावी विचारप्रवाह. भगवा झेंडा, हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचा स्वाभिमान आणि हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमक भूमिका ही शिवसेनेच्या राजकीय ओळखीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.*

*ना. एकनाथ शिंदे* यांनी या परंपरेशी आपली नाळ जोडून ठेवत संघटनात्मक विस्ताराचा प्रयत्न केला. पक्षांतर्गत संघर्षाच्या कठीण टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष चर्चेत आले.

हिंदुत्वाचा गजर करताना सामाजिक सलोखा राखणे, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि विविध समाजघटकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेणे ही नेतृत्वासमोरील मोठी जबाबदारी आहे.

त्यांच्या राजकीय शैलीत आक्रमकता असली तरी शासनकर्त्याच्या भूमिकेत सर्वसमावेशकतेची कसोटी महत्त्वाची ठरते. याच कसोटीवर त्यांच्या नेतृत्वाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

*लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ* : *महिला सक्षमीकरणाचा नवा राजकीय आणि सामाजिक अध्याय*!

*ना. एकनाथ शिंदे* यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील सर्वाधिक चर्चेत आलेल्या आणि व्यापक जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या उपक्रमांमध्ये *‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’* या योजनेचा विशेष उल्लेख करावा लागेल.

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळ देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणाच्या गरजांकडे लक्ष देणे आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत त्यांचे स्थान अधिक सक्षम करणे या उद्देशाने जून २०२४ मध्ये या योजनेला मान्यता देण्यात आली.

या योजनेअंतर्गत पात्र २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली.

ही रक्कम केवळ आर्थिक मदत म्हणून पाहण्यापेक्षा अनेक महिलांसाठी स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्याचे, औषधोपचार करण्याचे, मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचे आणि दैनंदिन खर्चात मदत मिळवण्याचे साधन ठरलीय असे आज ठामपणे कुणीही म्हणू शकतेय.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मानाने संबोधित करण्यासाठी *‘लाडकी बहीण’* ही संकल्पना पुढे आली. योजनेच्या शुभारंभाच्या वेळी *ना. एकनाथ शिंदे* यांनी या आर्थिक मदतीचे वर्णन बहिणींना माहेरच्या आहेराप्रमाणे मिळणारी भेट असे केले होते. यातूनच त्यांच्या राजकीय प्रतिमेला एक भावनिक आयाम प्राप्त झाला.

राजकारणात बहिणींच्या प्रश्नांकडे केवळ मतदार म्हणून नव्हे, तर कुटुंबातील महत्त्वाचा घटक म्हणून पाहण्याचा हा संदेश होता. लाखो-करोडो महिलांपर्यंत पोहोचलेल्या या योजनेमुळे त्यांना *‘लाडक्या बहिणींचा भाऊ’* अशी लोकप्रिय आणि अजरामर ओळख मिळालीय.

महाराष्ट्रातील महिला वर्गाशी भावनिक नाते जोडणारी ही त्यांच्या नेतृत्वातील महत्त्वाची राजकीय-सामाजिक घटना ठरली.

*लेक लाडकी योजना* : *जन्मापासून शिक्षणापर्यंत कन्येच्या भविष्याची काळजी*!

महिला सक्षमीकरणाची सुरुवात मुलीच्या जन्मापासूनच झाली पाहिजे, या विचाराला बळ देणारी योजना म्हणजे ‘लेक लाडकी योजना’.

ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या योजनेला मान्यता दिली.

मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींचे शिक्षण प्रोत्साहित करणे, आर्थिक अडचणींमुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, कुपोषण रोखणे आणि बालविवाहाला प्रतिबंध करणे हे या योजनेचे महत्त्वाचे उद्देश आहेत.

पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक पात्र कुटुंबांतील मुलींना विविध टप्प्यांवर एकूण १ लाख १ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली.

यामध्ये :

• मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये.
• पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर ६,००० रुपये.
• सहावीत प्रवेश घेतल्यानंतर ७,००० रुपये.
• अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ८,००० रुपये.
• वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५,००० रुपये.

अशा पद्धतीने मुलीच्या बालपणापासून उच्च शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत आर्थिक आधार देण्याची संकल्पना या योजनेत आहे.

विशेष म्हणजे, मुलीचा जन्म हा कुटुंबासाठी आर्थिक ओझे नसून आनंदाचा आणि अभिमानाचा विषय ठरावा, हा सामाजिक संदेशही या योजनेतून दिला जातो.

मुलगी शिकली, सक्षम झाली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. त्यामुळे ‘लेक लाडकी’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून मुलींच्या भविष्याबद्दल सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

*मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक बळ : शिक्षणाचे दरवाजे अधिक खुले*!

महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडथळे येऊ नयेत, ही सामाजिक गरज लक्षात घेऊन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पात्र मुलींसाठी उच्च शिक्षणातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), इतर मागासवर्ग (OBC) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) या प्रवर्गांतील पात्र मुलींना यापूर्वी मिळणाऱ्या ५० टक्के शुल्क सवलतीऐवजी १०० टक्के शुल्क सवलत देण्याचा निर्णय जुलै २०२४ मध्ये घेण्यात आला.

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असलेल्या पात्र विद्यार्थिनींना पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी निर्धारित शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली.

या निर्णयामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसह पात्र उच्च शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न झाला.

विशेषतः ग्रामीण भागातील, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांतील मुलींना शिक्षणासाठी कुटुंबावर पडणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होऊ शकते.

मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक म्हणजे राज्याच्या भविष्यामध्ये गुंतवणूक. या भूमिकेतून पाहिले तर मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय हा सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतोय.

*गुलाबी ई-रिक्षा योजना : महिलांच्या स्वावलंबनाला गतिमान करणारा उपक्रम*!

महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे; तर स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची आणि स्वतंत्र आर्थिक ओळख उभी करण्याची संधी उपलब्ध करून देणे होय.

याच विचारातून जुलै २०२४ मध्ये ‘गुलाबी ई-रिक्षा’ योजनेची घोषणा करण्यात आली.

महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेत पात्र महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी ७० टक्के कर्ज, २० टक्के राज्य शासनाचा हिस्सा आणि १० टक्के लाभार्थी महिलेचा हिस्सा अशी आर्थिक रचना निश्चित करण्यात आली. आठ जिल्ह्यांतील प्रमुख शहरांमध्ये १० हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

या उपक्रमातून महिलांना केवळ प्रवासी म्हणून नव्हे, तर रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजिका म्हणून पुढे येण्याची संधी मिळू शकते.

घरातील आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये हातभार लावण्यापासून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यापर्यंतचा प्रवास या योजनेतून शक्य होऊ शकतो.

*महिलांच्या प्रवासाला दिलासा : सुरक्षितता आणि आर्थिक बचतीचा विचार*!

महिलांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत देण्याचा निर्णय मार्च २०२३ मध्ये अंमलात आला.

या सवलतीमुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिला, ग्रामीण भागातून शहरात जाणाऱ्या भगिनी, विद्यार्थिनी आणि नियमित प्रवास करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत मिळाली.

महिलांच्या दैनंदिन जीवनातील प्रवासखर्च कमी करण्यासाठी घेतलेला हा निर्णय सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.

महिलांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांची आर्थिक बचत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सहभाग वाढवणे हा अशा उपक्रमांचा व्यापक हेतू आहे.

*युवकांचा लाडका भाऊ* : *रोजगार, कौशल्य आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय*!

महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर युवकांच्या रोजगाराचा आणि भविष्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करत एकनाथ शिंदे यांनी ‘लाडका भाऊ’ या संकल्पनेशी जोडलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुढे आणलीय.

१७ जुलै २०२४ रोजी पंढरपूर येथे त्यांनी या उपक्रमाची घोषणा केली.

बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष उद्योगांमध्ये कामाचा अनुभव मिळावा, त्यांच्या कौशल्यात वाढ व्हावी आणि भविष्यात रोजगार मिळवण्याची क्षमता विकसित व्हावी हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

या योजनेत शैक्षणिक पात्रतेनुसार सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत दरमहा पुढील विद्यावेतनाची तरतूद करण्यात आली :

• बारावी उत्तीर्ण युवक-युवती : ६,००० रुपये.
• आयटीआय किंवा पदविकाधारक : ८,००० रुपये.
• पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार : १०,००० रुपये.

विशेष बाब म्हणजे ही योजना केवळ पुरुषांसाठी मर्यादित नसून पात्र महिला उमेदवारांनाही तिचा लाभ घेता येतो.

उद्योग, स्टार्टअप, सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची या योजनेची संकल्पना आहे.

युवकांना केवळ नोकरीची आश्वासने न देता कामाचा अनुभव, कौशल्यविकास आणि आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा आहे.

यातूनच ‘लाडका भाऊ’ ही ओळख युवकांशी जोडली गेली.

एका बाजूला बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण, तर दुसऱ्या बाजूला युवकांच्या कौशल्यविकासासाठी लाडका भाऊ, अशी सामाजिक कल्याणाची भावनिक मांडणी त्यांच्या नेतृत्वाशी जोडली गेली.

बहिणीच्या हाताला आर्थिक बळ आणि भावाच्या हाताला कामाचे कौशल्य, ही संकल्पना समाजातील कुटुंबकेंद्रित भावविश्वाला स्पर्श करणारी ठरली.

यामुळे *ना. एकनाथ शिंदे* यांच्या व्यक्तिमत्त्वाला केवळ आक्रमक राजकीय नेत्याची नव्हे, तर बहिणींचा आणि युवकांचा आधार बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या नेतृत्वाची प्रतिमाही प्राप्त झाली.

*महिला आणि युवकांच्या पलीकडे : सर्वसामान्य कुटुंबांच्या विकासाचा ध्यास*!

समाजकल्याणाची व्याप्ती एका योजनेपुरती मर्यादित नसते. शेतकरी, कामगार, लघुउद्योजक, महिला बचतगट, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे या सर्व घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक असते.

*ना. एकनाथ शिंदे* यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विविध सामाजिक आणि आर्थिक योजनांवर भर देण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न, आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि रोजगाराच्या संधी या विषयांना महत्त्व देण्यात आले.

महिलांसाठी आर्थिक मदत, मुलींसाठी शिक्षण, युवकांसाठी प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा या वेगवेगळ्या क्षेत्रांतील उपक्रमांमधून कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाचा विचार पुढे आला.

या योजनांचे खरे यश त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आणि दीर्घकालीन आर्थिक शाश्वततेत आहे.

*संघटन कौशल्य : शिवसैनिकांच्या ताकदीवर उभे राहिलेले नेतृत्व*!

कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते.

*ना. एकनाथ शिंदे* यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या संघटनात्मक जाळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शाखाप्रमुख म्हणून काम करताना मिळालेला अनुभव, ठाणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची जाण, कार्यकर्त्यांशी निर्माण केलेली जवळीक आणि पक्षातील विविध स्तरांवरील समन्वय ही त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाची साधने ठरली.

आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि सक्रिय शिवसैनिकांचे जाळे ही त्यांच्या राजकीय सामर्थ्याची महत्त्वाची बाजू आहे.

कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, जबाबदाऱ्या सोपवणे आणि संघटनात्मक पातळीवर त्यांना सक्रिय ठेवणे हे पक्षाच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते.

निवडणुकीतील नियोजन, बूथ पातळीवरील यंत्रणा, मतदारांशी संपर्क आणि स्थानिक नेतृत्वाची सक्रियता यांचा समन्वय साधण्याचे संघटनात्मक कौशल्य त्यांच्या राजकीय प्रवासात ठळकपणे दिसते.

*सामान्य माणसाचा नेता : उपलब्धता आणि आपुलकीची ताकद*!

राजकारणात मोठी भाषणे करणे सोपे असते; परंतु सामान्य माणसाचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि त्याच्या समस्येचा पाठपुरावा करणे हे अधिक महत्त्वाचे असते.

एखाद्या कुटुंबाचा घराचा प्रश्न असो, रस्त्यांची समस्या असो, शेतकऱ्याचे नुकसान असो, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी असोत किंवा एखाद्या रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न असो, लोकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी विश्वासाचे व्यासपीठ हवे असते.

*ना. एकनाथ शिंदे* यांच्या समर्थकांकडून त्यांच्या जनसंपर्काची, कार्यकर्त्यांशी असलेल्या जवळीकीची आणि नागरिकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याच्या शैलीची विशेष दखल घेतली जाते.

समस्येची पडताळणी, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क, प्रशासकीय पाठपुरावा आणि निराकरणासाठी प्रयत्न ही प्रभावी लोकप्रतिनिधित्वाची मूलभूत सूत्रे आहेत.

जनतेच्या मनातील आपुलकी टिकवायची असेल, तर पदापेक्षा माणसाला महत्त्व देणारी वृत्ती कायम ठेवावी लागते.

*विकासाची घोडदौड : आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प*!

महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना महामार्ग, मेट्रो, पूल, औद्योगिक गुंतवणूक, नागरी वाहतूक, गृहनिर्माण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचे महत्त्व मोठे आहे.

*ना. एकनाथ शिंदे* यांनी सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळताना पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला.

समृद्धी महामार्ग, मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक आणि नागरी वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण या विषयांना त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात महत्त्व प्राप्त झाले.

विकास म्हणजे केवळ मोठे रस्ते आणि उंच इमारती नव्हेत. तर ग्रामीण भागात रोजगार निर्माण होणे, शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणे, युवकांना नोकरी मिळणे, महिलांना सुरक्षितता मिळणे आणि सामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावणे म्हणजे खरा विकास.

*मित्रपक्षांशी समन्वय आणि राजकीय रणनीती : धाडस व निर्णयक्षमतेचा संगम*!

महाराष्ट्राच्या राजकारणात युतीचे राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे असते. मित्रपक्षांचा विश्वास, स्थानिक नेतृत्वाचे हितसंबंध, जागावाटप, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि सत्तेतील समन्वय या सर्व बाबींचा विचार करावा लागतो.

*ना. एकनाथ शिंदे* यांनी भाजपसोबत महायुतीच्या माध्यमातून राजकीय समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. २०२२ मधील राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्रीपद स्वीकारणे आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५७+३ = ६० जागांवर विजय मिळवून देणे हा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.

राजकीय विरोधकांच्या आव्हानांना सामोरे जाणे, पक्षातील नाराजी हाताळणे, मित्रपक्षांशी संबंध टिकवणे आणि निवडणुकीच्या रणनीतीत सातत्य ठेवणे या बाबी त्यांच्या नेतृत्वाच्या अभ्यासातील महत्त्वाचे विषय आहेत.

त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने हे धाडसी नेतृत्वाचे उदाहरण आहे, तर विरोधकांच्या दृष्टीने या घटनांचे राजकीय मूल्यमापन वेगळे असू शकते. मात्र, महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणावर त्यांच्या निर्णयांचा मोठा प्रभाव पडला आहे.

*विश्वासू सहकारी आणि संघटनात्मक यंत्रणा : यशामागील अदृश्य शक्ती*!

एखाद्या नेत्याचे यश कधीही एकट्या व्यक्तीचे नसते. त्यामागे वर्षानुवर्षे काम करणारे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नेतृत्व आणि संघटनात्मक यंत्रणा असते.

*ना. एकनाथ शिंदे* यांच्या राजकीय प्रवासातही दीर्घकाळ सोबत राहिलेले सहकारी आणि पक्षकार्याची मजबूत फळी महत्त्वाची ठरली आहे.

निवडणुकीच्या राजकारणात स्थानिक परिस्थितीचा अभ्यास, मतदारसंघनिहाय नियोजन, बूथ पातळीवरील संपर्क, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि प्रचारयंत्रणेतील समन्वय यांना विशेष महत्त्व असते.

नेतृत्वाची खरी क्षमता म्हणजे केवळ स्वतःभोवती विश्वासू वर्तुळ निर्माण करणे नव्हे, तर त्या वर्तुळाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणे आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या व्यापक ध्येयाशी जोडून ठेवणे होय.

*जनमानसातील प्रतिमा : लोकप्रियतेपेक्षा मोठा असतो विश्वास*!

*ना. एकनाथ शिंदे* यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा पैलू म्हणजे जनसंपर्कातून निर्माण झालेली आपुलकीची प्रतिमा.

*‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’* या संकल्पनांमधून त्यांच्या नेतृत्वाला भावनिक स्पर्श मिळाला. विशेषतः महिलांशी जोडलेले ‘लाडका भाऊ’ हे संबोधन त्यांच्या समर्थकांनी लोकप्रियतेने स्वीकारले.

मात्र, जनमानसातील विश्वास टिकवण्यासाठी केवळ भावनिक नाते पुरेसे नसते. योजनांचा लाभ वेळेवर मिळणे, प्रशासन पारदर्शक असणे, नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण होणे आणि सार्वजनिक जीवनात उत्तरदायित्व राखणे या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरलेल्या असतात.

राजकीय नेतृत्वाची खरी उंची जनतेच्या आयुष्यात घडवलेल्या सकारात्मक बदलांमधूनच मोजली जाते.

एकंदरीत *भगव्याचा अभिमान, बहिणींचा भाऊ आणि युवकांच्या स्वप्नांना बळ देणारे नेतृत्व*!

*ना. एकनाथ शिंदे* यांचा राजकीय प्रवास हा केवळ सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास नाही; तो संघर्ष, संघटन, राजकीय धाडस, प्रशासकीय जबाबदारी आणि सामाजिक अपेक्षांशी जोडलेल्या नेतृत्वाचा प्रवास आहे.

शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदापर्यंतची त्यांची वाटचाल अनेक राजकीय अभ्यासकांसाठी महत्त्वाचा विषय ठरली आहे.

त्यांच्या नेतृत्वातील आक्रमक राजकीय शैली, हिंदुत्वाची वैचारिक भूमिका, शिवसेनेची संघटनात्मक ताकद, विकासकामांचा पाठपुरावा आणि सर्वसामान्य माणसाशी जोडलेली नाळ या विविध पैलूंनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

मात्र, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महिला आणि मुलींसाठीच्या योजना हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील विशेष उल्लेखनीय अध्याय ठरतो.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून बहिणींच्या आर्थिक स्वावलंबनाचा प्रयत्न, ‘लेक लाडकी’ योजनेतून कन्येच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत आधार, उच्च शिक्षण शुल्कमाफीमधून विद्यार्थिनींच्या स्वप्नांना बळ, गुलाबी ई-रिक्षामधून महिलांना रोजगाराची संधी आणि ‘लाडका भाऊ’ संकल्पनेशी जोडलेल्या युवा प्रशिक्षण योजनेतून युवकांच्या कौशल्यविकासाला चालना देण्याचा प्रयत्न या सगळ्या बाबी त्यांच्या नेतृत्वाच्या सामाजिक बाजूला अधोरेखित करतात.

एकीकडे भगव्या विचारांचा बुलंद आवाज, दुसरीकडे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची जाणीव; एका बाजूला शिवसैनिकांची संघटनशक्ती, तर दुसऱ्या बाजूला युवकांच्या भविष्याची चिंता; एका बाजूला विकासाचा वेग, तर दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्याची भूमिका; या विविध पैलूंमधून *ना. एकनाथ शिंदे* यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आकाराला आले आहे.

त्यांच्यासमोर भविष्यातही अनेक आव्हाने आहेत. योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, महिला आणि युवकांसाठी अधिक रोजगारसंधी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महाराष्ट्राचा संतुलित विकास या कसोट्यांवर त्यांचे नेतृत्व अधिकाधिक सिद्ध होत राहावे लागेल.

कारण सत्ता ही तात्पुरती असते; पण समाजाच्या मनात निर्माण झालेला विश्वास हा नेतृत्वाचा सर्वांत मोठा ठेवा असतो.

भगव्याच्या झेंड्याखालील राजकीय संघर्ष, बहिणींच्या चेहऱ्यावरील समाधानाची अपेक्षा, युवकांच्या हातातील रोजगाराचे स्वप्न आणि महाराष्ट्राच्या विकासाची महत्त्वाकांक्षा या सगळ्यांचा संगम म्हणजे *ना. एकनाथ शिंदे* यांच्या नेतृत्वाची व्यापक ओळख!

वाघाची डरकाळी राजकीय मैदान दणाणून सोडते; पण बहिणीच्या मनातील भाऊ, युवकांच्या मनातील आधार आणि सामान्य माणसाच्या मनातील विश्वास हेच नेतृत्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जातात.

राजकारणात वादळे अनेक येतात; पण जनतेच्या मनात आपलेपणाची जागा निर्माण करणारे नेतृत्वच काळाच्या कसोटीवर आपली ओळख टिकवते.

आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन करताना एवढेच म्हणावेसे वाटतेय;

*“भगवा विचारांचा ध्यास, विकासाचा अखंड प्रवास; बहिणींचा लाडका भाऊ, युवकांच्या स्वप्नांचा आधार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद नेतृत्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here