मुंबई प्रतिनिधी
वरळी येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये आज भारतीय कामगार सेना आणि भाजपा कामगार संघ या दोन युनियन मध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. सेंट रेजिस हॉटेलमध्ये पाहिल्यापासून भारतीय कामगार सेनेची एकमेव युनियन होती. परंतु आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या भाजपा कामगार संघ या युनियनने आपले युनियन आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले होते. परंतु त्यास यश आले नाही. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा कामगार संघाने लावलेला युनियनचा फलक देखील उखडून फेकून दिला. यामुळे या हॉटेलमध्ये दोन युनियन मध्ये मोठ्या प्रमाणात तणावण्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही युनियनच्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलच्या बाहेर काढले.
आमची युनियन ही एकमेव युनियन मान्यता प्राप्त असून गेला अनेक वर्षापासून आमची युनियनमध्ये कामगारांसाठी कटिबद्ध आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देत आहोत तसेच त्यांच्या कोणत्याही कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहिलो आहोत आणि यापुढे देखील त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहणार. भारतीय जनता पार्टीची ही युनियन ही आता आलेली युनियन असून याला कामगारांचा जराही सपोर्ट नाही अशी माहिती भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस निशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली.








