मुंबई प्रतिनिधी
डॉ”अस्मिता” (जोगेश्वरी- मुंबई) या सामाजिक शैक्षणिक , सांस्कृतिक व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान करणारे डॉ.गजानन रत्नपारखी व डॉक्टर स्मृती रत्नपारखी*
यांचा संस्थेचे सरचिटणीस विश्वस्त श्री राजन चाचड व मुख्याध्यापक फडतरे यांच्या उपस्थित जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी *गुरुकृपा हार्ट फाउंडेशन व चॅरीटेबल ट्रस्ट* च्या वतीने अस्मिता माध्यमिक विद्यालयातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या व दफ्तरचे वाटप करण्यात आले.








