केतन खेडेकर
मलबार हिल येथील बाणगंगा परिसरातील महिलांसाठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना नेत्या सुशिबेन शाह यांनी पक्षातील सहकाऱ्यांसह भव्य हळदी-कुंकू व दांडिया रास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि नवरात्राचा आनंद लुटला. उत्कृष्ट वेशभूषा, गरबा व मेकअप करणाऱ्या महिला विजेत्यांना मायक्रोवेव्ह ओव्हन बक्षीस देण्यात आले, तर उत्तेजनार्थ ३ स्मार्ट वॉचेस भेट देण्यात आले.
या सोहळ्याला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल मुकेश म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्ही नेहमी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो महिलांना सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आम्ही विविध स्वयंरोजगार शिबिर देखील आयोजन केले होते यापुढे देखील आम्ही महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या सुशीबेन शाह यांनी दिली. या कार्यक्रमात मलबार हिल विभाग प्रमुख प्रवीण कोकाटे,महिला विभागप्रमुख नीलम पवार, माजी नगरसेविका हंसा मारू , शाखाप्रमुख नितीन गावडे, लतिक्षा रामाणे, शिवडी महिला विभाग प्रमुख अनुराधा इनामदार, मुंबादेवी महिला विभाग प्रमुख रेखा सुरणकर , लता ताई पाटील, रेखा मोरे, कुलाबा विधानसभा संघटना समिक्षा पोफळे, प्रिया ताई राणे, हिराताई, सुमन पारीख, मानसी पुजारे, प्रियांका बडदे, चंदा दराल या सर्व सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.








