Home ब्रेकिंग बातम्या मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा,...

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा, आमदार मिलिंद नार्वेकर

0


केतन खेडेकर
मुंबईचे डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली. मुंबईतील विविध कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी जेवणाचे डबे पोहचविण्याचे त्यांचे तंत्र जगात प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राज्यपासून अनेकांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सामाजिक व संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलेले आणि जगभरात ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखले जाणारे ‘मुंबईचे डब्बेवाले’ आता मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दृष्टचक्रात अडकले आहेत. मुंबईतील एसी (AC) लोकलच्या वाढत्या फेऱ्यांमुळे डबेवाल्यांना डबे वेळेत पोहोचवण्यात अनंत अडचणी येत आहेत. एसी लोकलमध्ये मालवाहतुकीसाठी स्वतंत्र सोय नसल्याने डबेवाल्यांची गैरसोय होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने नियमित लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. नियमित लोकल उशिरा धावत असल्याने त्यांना डबे पोहोचवण्यास उशीर होत आहे. मेट्रो आणि मोनो रेलमध्ये सामान घेऊन प्रवासास मनाई असल्याने डबेवाल्यांना जुन्याच लोकलवर अवलंबून राहावे लागत आहे. यास्तव डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करण्याबाबत राज्य शासनाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अधिवेशनात विशेष उल्लेखनीय सूचनेद्वारे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here