Home Uncategorized झोपडपट्टीवासीयांची कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा.

झोपडपट्टीवासीयांची कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा.

0




मुंबई प्रतिनिधी
महायुती सरकारच्या राजवटीत SRA भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. मुंबईतील गोरगरिबांच्या हक्कांवर बुलडोझर फिरवून एसआरमधील अधिकारी बिल्डरांसाठी काम करत आहेत. लोकप्रतिनिधींनाही ते जुमानत नाहीत, अशा मुजोर अधिकाऱ्यांविरोधात व एसआरएमधील भ्रष्टाचाराविरोधात मुंबई काँग्रेसच्या स्लम विभागाने आज एसआरएच्या वांद्रे येथील कार्यालयावर हजारोंचा धडक मोर्चा काढला. झोपडपट्टीवासीयांची कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी टीका काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.
या मोर्चात संघटन प्रभारी प्रणिल नायर, मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक बब्बू खान, अशरफ आझमी, सुफियन वनू, मोहसिन हैदर, राजा रहेबर, कचरू यादव, सुभाष भालेराव, खजिनदार संदीप शुक्ला, महासचिव महेंद्र मुणगेकर, किशोर सिंग, नीता महाडिक, रहेनुमा सिद्दिकी, आनंद यादव, जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता, क्लाइव्ह डायस, मंदार पवार इत्यादी नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील आणि मुंबईच्या इतर भागातील नागरिकांच्या तक्रारी खासदार वर्षाताई गायकवाड यांनी जाणून घेतल्या, या संदर्भात SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याशी पूर्वनियोजित बैठक निश्चित करण्यात आली होती. मात्र कल्याकणर यानी बैठकीला उपस्थित न राहून खासदार व मुंबईकरांचा अपमान केला. ही लोकशाहीची थट्टा असून भाजपा राजवटीत प्रशासकीय यंत्रणा मुजोर झाली आहे. ते हुकूमशाह सारखे वागत आहेत. झोपडपट्टी धारकांचे प्रश्न सोडवा व खासदार वर्षाताई गायकवाड यांची कल्याणकर यांनी जाहिर माफी मागावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्याची माहिती सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here