Home ब्रेकिंग बातम्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्या अहवालाचे मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रकाशन

आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या कार्या अहवालाचे मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रकाशन

0



केतन खेडेकर
वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून  शपथ घेतल्याच्या दिनांकापासून आज एक वर्ष पूर्ण होत असताना, मागील वर्षभरात मी वसई मतदार संघाच्या विकासासाठी – प्रगतीसाठी केलेल्या कामांची  माहिती देणारा “ कार्य अहवाल २०२४ – २५” आज सोमवार दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आला.


हा कार्य अहवाल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते नागपुर येथे प्रकाशित करण्यात आला.तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राहुल नार्वेकर जी  यांच्या कडे अहवाल सादर करण्यात आला.

     या कार्य अहवालामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, सार्वजनिक सेवा, सुरक्षा, तसेच नागरिकांशी सततचा संवाद या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात केलेल्या कामांची पारदर्शक नोंद या अहवालातून सादर करण्यात आली आहे.

या प्रसंगी आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी वसईतील नागरिकांचे तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे मनःपूर्वक आभार मानले. “वसईच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक काम करण्याची माझी बांधिलकी कायम राहील,” असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here