केतन खेडेकर (नागपूर प्रतिनिधी) – सलग ३० वर्षे नागपूर हिवाळी अधिवेशन कामकाज कव्हर करणारे मुंबईतील ज्येष्ठ फोटोग्राफर अरविंद खरात यांचा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज त्यांच्या दालनात गौरव केला.
सन १९९५ मध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कारकीर्दीत अरविंद खरात यांनी नागपूर हिवाळी अधिवेशन कामकाज कव्हर करायला सुरुवात केली आणि आज २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत त्यांना हे कामकाज कव्हर करताना ३० वर्षे पूर्ण होत आहेत.
विधानसभेची वर्षभरात तीन अधिवेशन होत असतात. त्यातील पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये पार पडते तर उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडते. वयाची ६१ वर्ष पूर्ण होत आली तरी अरविंद खरात हे अधिवेशन काळात फोटोग्राफर म्हणून कामकाज कव्हर करताना दिसत असतात त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले जाते. आज त्यांचा गौरव करण्यात आला त्याबद्दल पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेने अभिनंदन केले आहे.
Home ब्रेकिंग बातम्या *ज्येष्ठ फोटोग्राफर अरविंद खरात यांचा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी केला गौरव








