मुंबई प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या चर्चगेट येथील तैलचित्राला विविध मान्यवरांनि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर याचं सामाजिक कार्य, न्यायप्रिय प्रशासन आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श अंगीकारून आपण सर्वांनी समाजहितासाठी योगदान द्याव, हीच खरी आज काळाची गरज आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे काम फार प्रेरणादायी असून त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषय कार्यक्रम करत असतो. यावर्षी देखील आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख दलित नाईक यांनी दिली. या कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे, धनगर समाजाचे नेते माजी, आमदार प्रकाश अण्णा शेडगे, प्रवक्ता, श्रीमती सुशिबेन शहा, उपविभाग अध्यक्ष प्रथमेश शहा, शाखा प्रमुख, निलेश भोईटे, संतोष पवार , श्रीमती कविता मल्हार, आणि पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








