Home ब्रेकिंग बातम्या सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग शिवसेना मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग शिवसेना मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील

0

केतन खेडेकर 
सध्या या इंटरनेटच्या युगात सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे सोशल मीडिया हे एकमेव माध्यम असून सध्या सोशल मीडियाचे युग असून हे युग फार फास्ट  आहे असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे मुंबादेवी विधानसभा प्रमुख रुपेश पाटील  यांनी वाळकेश्वर येथे आयोजित केलेल्या सोशल मीडिया आणि जग या कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले सध्या सोशल मीडिया हे एक नवीन युग आलेले आहे. सध्या माणूस सकाळी उठल्यावर या इंटरनेट पासून ते रात्री झोपेपर्यंत इंटरनेटवर अवलंबून असतो. आजकाल बातम्या बघताना देखील लोक मोबाईल वरील इंटरनेट वापरून सर्व युट्युब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्र देखील या इंटरनेटवर वाचत असतात. या इंटरनेटचा वापर सर्वसामान्य नागरिकांना कसा व्हावा आणि त्यांना सर्व गोष्टी कशाच एकाच मोबाईल वरती उपलब्ध होतील यासाठीच आम्ही हे सोशल मीडिया आणि त्याचा वापर कसा करावा यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या  प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ही एक सुरुवात असून यापुढे देखील मोठ्या प्रमाणात अशा शिबिराचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिवसेनेचे मुंबादेवी विभाग प्रमुख रुपेश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्त्या सुशीबेन शाह, शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना आंबोले,  महिला विभाग प्रमुख नीलम पवार, समीक्षा पोफळे, सुधांशू भट, रेखा सुरणकर आणि इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here