Home ब्रेकिंग बातम्या मालाड पश्चिम डी. जी. नगर येथील सार्वजनिक मैदानात स्थानिकाना प्रवेश का नाकारला...

मालाड पश्चिम डी. जी. नगर येथील सार्वजनिक मैदानात स्थानिकाना प्रवेश का नाकारला जातोय,आमदार मिलिंद नार्वेकर यांची मागणी

0


मुंबई प्रतिनिधी
म्हाडाच्या मालकीच्या दादासाहेब गायकवाड नगर, मालवणी, मालाड येथील ५७.५ एकर (२,३०,००० चौ.मी) जमीन महाराष्ट्र पोलीस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन या संस्थेला दिनांक १४/०५/१९९९ च्या करारानुसार भाडेपट्ट्याने (Lease) गृहनिर्माण पुनर्विकास योजनेसाठी देण्यात आली आहे. सदर अभिन्यासामध्ये हा भूखंड मनोरंजन मैदान (R.G.) म्हणून आरक्षित असून, खासगीकरण झालेले नाही, त्यामुळे मैदानाचे खासगीकरण झाल्याची बातमी आणि प्राप्त झालेली तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही.
सदर पुनर्विकास पूर्ण झाल्यावर हे मैदान पुन्हा शासनास हस्तांतरित करणे हे महाराष्ट्र पोलीस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनला बंधनकारक राहील अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी अधिवेशनात उत्तर देताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here