न्यूयॉर्क दि.9~
अमेरिकेतील न्युयॉर्क येथे इंडी फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2025 चे आयोजन करण्यात आले असून या फिल्म फेस्टिव्हल चे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदास आठवले आणि न्यूयॉर्क चे महापौर एरिक ऍडम यांच्या हस्ते करण्यात आले. न्यूयॉर्क मध्ये इंडी फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड चे आयोजन मुकेश मोदी यांनी केले आहे. यावेळी सौ.सीमाताई आठवले, जीत आठवले व चंद्रशेखर कांबळे उपस्थित होते. ना.रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर असून येत्या ११ जून रोजी मुंबईत परतणार आहेत. इंडी फिल्म फेस्टीव्हल ॲवॉर्ड एक महत्वपूर्ण अवॉर्ड असून या अवॉर्ड चे वितरण ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यात अनेक मान्यवर उपस्थित होते.








