मुंबई प्रतिनिधी
भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, गजानन नागे याचें वाढदिवसाच्या निमित्ताने मिरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक १४ मिरागाव शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक मोहन म्हात्रे सौ सुरेखा सोनार, विना भोईर उपस्थित होते,तसेच बेस्ट आगारातील कामगारांना आगारात लाडू मिठाई वाटप करण्यात आले. आम्ही नेहमीच समाजात चांगले कार्य रुजवण्यासाठी काम करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती कामगार नेते गजानन नागे यांनी दिली. भाजपा प्रदेश सदस्य, सरचिटणीस हनुमंत अण्णा लांडगे कामगार मोर्चा सरचिटणीस उपस्थित होते, अनेक आगारातील कामगारांनी मोठया प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच श्री स्वामी समर्थ महाराज मठ मिरारोड मध्ये स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Home ब्रेकिंग बातम्या कामगार नेते श्री गजानन नागे वाढदिवसानिमित्ताने मोफत वह्या वाटप कार्यक्रम जल्लोषात








