Home ब्रेकिंग बातम्या प्रभाग क्रमांक 199 शिंदे शिवसेनेच्या उमेदवार रुपल राजेश कुसळे यांचा प्रचार जल्लोषात

प्रभाग क्रमांक 199 शिंदे शिवसेनेच्या उमेदवार रुपल राजेश कुसळे यांचा प्रचार जल्लोषात

0



मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मुंबईतील प्रभाग क्र १९९ मध्ये शिवसेना भाजप-मित्रपक्ष महायुतीद्वारे स्थानिक उमेदवार म्हणून शिवसेनेच्या रूपल कुसळे उभ्या आहेत. सानेगुरुजी मार्ग परिसरात कुसळे यांचा दणकून प्रचार सुरु आहे. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी कुसळे यांचा झंझावाती प्रचार सुरु केला आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, खा. मिलिंद देवरा यांच्या मार्गदर्शनानुसार रूपल राजेश कुसळे विभागात कार्यरत आहेत. प्रभागातील पाण्याचे नियोजन असो, कचरा व्यवस्थापन असो, सार्वजनिक वाहतुकीची दुरावस्था असो किवा महिलांच्या सुरक्षिततेचा विषय असो. एक सुशिक्षित महिला
म्हणून कुसळे यांचा समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे पाणीपुरवठा, रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रत्त्येक घरात पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळण्याची खात्री करणे, रस्त्याची आणि ड्रेनेजची व्यवस्था सुधारणे
महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण – प्रभागात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी उपाययोजना करणे आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिला आघाडीच्या मार्गदर्शनाने मो महिला बचतगट योजने अंतर्गत खाद्य पदार्थ विक्री, अशिक्षित महिलांचे साक्षरता वर्ग, घरगुती समस्या निवारण, महिलांच्या विविध आजाराबाबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन या सारखे विविध महिलांचे उपक्रम राबविले. अनेक करण विविध रुग्णालयात दाखल करून आरोग्य सेवा उमेदवार रूपल कुसळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहायता निधीमधून देखील नागरिकांना अनेक वैद्यकीय स्वयं तसेच मोठमोठे ऑपरेशन विनामूल्य करून देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रभागातील महिलांना मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा निधी देखील त्यांनी मिळवून दिला आहे. त्यामुळे प्रभागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून आपापल्या पायावर उभे राहू शकले आहेत. मी विभागातील महिलांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना आणि युवकांना आवाहन करते की तुम्ही मला फक्त एक दिवस द्या मी तुम्हाला पुढील पाच वर्षे देते. माझे पती शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे ब्रीदवाक्य आहे की तुमचे काम झाले तर इतरांना सांगा नाही झाले तर मला सांगा. या ब्रीदवाक्यप्रमाने मी काम करत आहे आणि यापुढे देखील करत राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 199 च्या  शिवसेना उमेदवार रूपल राजेश कुसळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here