Home ब्रेकिंग बातम्या डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिवाळीनिमित्त दिल्या शुभेच्छा

डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिवाळीनिमित्त दिल्या शुभेच्छा

0


मुंबई प्रतिनिधी
प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिवाळीनिमित्त आपल्या अंधेरी येथील टीव्ही मध्ये विविध लोकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात त्यांनी विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन केले. आम्ही दरवर्षी दिवाळी निमित्त विभागातील नागरिकांना तसेच बांधवांना विविध भेट वस्तूचे आणि फराळाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील दिवाळीनिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळी हा आनंद वाटण्याचा,  आनंद  द्विगुणीत करण्याचा एकोपा ठेवण्याचा सोहळा आहे. यापुढे देखील आम्ही हा सोहळा असाच निरंतपणे साजरा करणार असल्याची माहिती डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिली. याप्रसंगी दैवज्ञ पतपेढीचे संचालक आणि अंधेरी दैवज्ञ समाजाचे उपाध्यक्ष डॉक्टर विष्णू पाटणकर, महेश पैठणकर, अनिल कारेकर, सुधीर धारगळकर आणि पत्रकार केतन खेडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here