राष्ट्रपिता महात्मा गांधी हे खरोखरच महात्मा होते त्यांनी कधीही कोणत्या लोभाची आणि प्रलोभनाची अपेक्षा केली नाही. देशासाठी त्याग देण्याचे काम जर कोणी केला असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले आहे. देश स्वतंत्र करण्याचे मोहिमेला त्यांनी अहिंसेने सुरुवात करून त्यात त्यांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाले असल्याची माहिती आमदार अमिन पटेल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जन्म जयंती निमित्त फोर्ट येथील त्यांच्या पुतळ्यास श्रद्धांजली वाहून दिली.
क यावेळी नगरसेवक जावेद जुनेजा, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष तारक शाह, अशफाक सिद्दीकी, मुंबादेवी युवक काँग्रेस अध्यक्ष जुनेद कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.








