मुंबई प्रतिनिधी: विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन प्रभात समयी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ गायक बाबूराव सणस (वय ६०) व महेश खेतले( वय ५६ ) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाचे सल्लागार चित्रोळीकार मुकुंद कुलकर्णी,ज्येष्ठ वृत्तपत्र
लेखक कृष्णा काजरोळकर,व साहित्यिक वासुदेव कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.या प्रसंगी प्रमुख वक्क्ते काजरोळकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव केला.सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्विकारल्याच्या दिवसाचे स्मरण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.दसरा याचे महत्व सांगताना काजरोळकर म्हणाले रामायणातून भगवान रामांनी रावणावर मिळविलेला विजय तसेच दूर्गादेवीने महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो.ज्येष्ठ नागरिकांविषयी बोलताना ते म्हणाले,म्हातारे कधीच थकणार नाहीत.कारण ते म्हातारे नाहीत तर ते महा-तारे आहेत.यावेळी सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन दसराचे सोने लुटले.कार्यक्रमास प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड, सचिव पत्रकार नासिकेत पानसरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्ती मस्के यांनी केले होते.प्रारंभी प्रभातच्या गायकांनी गाणी गाऊन वातावरण प्रफुल्लित केले होते.
Home ब्रेकिंग बातम्या प्रभात मित्र मंडळात धम्मचक्र प्रवर्तनदिन,विजयादशमी,जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा








