मुंबई प्रतिनिधी
आरे येथील धडक कामगार युनियन यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी रक्तदान केले.राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष अभिजीत राणे तसेच आरे मंडळ अध्यक्ष महेंद्र झगडे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद लाभत 200रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष न्यायमूर्ती शर्मा नगरसेवक विनोद मिश्रा आरे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिरपूरकर व आरे पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील उपस्थित होते. यावेळी 200 रक्तदात्यांनी रक्तदान करीत कार्यक्रमात चांगला प्रतिसाद दिला
या शिबिराला भाजपचे महामंत्री रवींद्र तिवारी, राम शिंदे, सचिव महादेव भालेकर,उमेश तिवारी उपाध्यक्ष डी डी सावंत, चौधरी, सचिव श्रीमती राखी गुप्ता, उपाध्यक्ष संदीप कंधारे, सुनील वर्मा,अमित झगडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते








