मुंबई प्रतिनिधी
मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमितजी साटम यांनी नुकतीच सकाळी आरे कॉलनीतील फिल्मसिटी हबाले आदिवासी पाड्याला भेट दिली.
यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन करून त्यांच्यासोबत दिवाळीच्या आनंदात सहभागी झाले. तसेच, दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना प्रेमपूर्वक फराळही भेट दिला.
यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अमितजी साटम यांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी त्यांनी आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आदिवासी समाजाचे पारंपरिक वाद्य असलेल्या तारपा वाद्य वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी अमितजी यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी आदिवासींसोबत ठेका धरला. त्यानंतर
त्यांनी प्रत्येक आदिवासी. बांधव आणि भगिनींशी संवाद प्रत्येकाशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ॲड ज्ञानमूर्ती शर्माजी, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा मा. नगरसेविका सौ प्रीती मनोज सातम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








