Home ब्रेकिंग बातम्या स्‍थानीय लो‍काधिकार सेना महासंघामुळे महाराष्‍ट्र सुरक्षा रक्षक मंडळ कर्मचा-यांना मिळाला न्याय

स्‍थानीय लो‍काधिकार सेना महासंघामुळे महाराष्‍ट्र सुरक्षा रक्षक मंडळ कर्मचा-यांना मिळाला न्याय

0



मुंबई प्रतिनिधी : शिवसेनेची अंगीकृत संघटना स्‍थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्‍या वतीने आज महाराष्‍ट्र सुरक्षा मंडळाच्‍या सानपाडा येथील मुख्‍यालयासमोर तीव्र निदर्शने करण्‍यात आली. महानगर टेलिफोन निगम आस्‍थापनेमध्‍ये महामंडळाचे सुमारे ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांना महामंडळाकडून नियमित मासिक वेतन मिळत नाही. परिणामी या कर्मचा-यांच्‍या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत महासंघाचे अध्‍यक्ष तथा शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली यापूर्वी एम.टी.एन.एल. प्रशासनाबरोबर बैठक होऊन दोन महिन्‍यांचे वेतन अदा केले होते, परंतु आता दिवाळीचा सण आलेला असताना कर्मचा-यांचे ४ महिन्‍यांचे वेतन थकीत आहे. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले कुटुंबाची दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्‍न कर्मचा-यांसमोर असून महाराष्‍ट्र सुरक्षा मंडळ आपली जबाबदारी झटकत असल्‍याचे निदर्शनास येते.

याप्रकरणी महासंघाचे अध्‍यक्ष तथा शिवसेना नेते गजानन कीर्तिकर व कार्याध्‍यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्‍या सूचनेनुसार महासंघाचे सरचिटणीस अरूण मोरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थानीय लोकाधिकार सेना महासंघातर्फे महाराष्‍ट्र सुरक्षा मंडळाच्‍या सानपाडा येथील मुख्‍य कार्यालयासमोर आज तीव्र निदर्शने करण्‍यात आली. त्‍यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्‍यक्ष अशोक डोके यांची महासंघाच्‍या शिष्‍टमंडळाने भेट घेऊन मागण्‍यांचे निवेदन सादर केले. यावेळी झालेल्‍या बैठकीत श्री. डोके यांनी असे सांगितले कि, एम.टी.एन.एल. मधील सुरक्षा सेवा खंडीत करण्‍याची नोटीस पाठवण्‍यात आली असून  त्‍याची तातडीने कार्यवाही करण्‍यात येईल. थकीत वेतनधारक कर्मचा-यांना ४ महिन्‍यांसाठी प्रत्‍येकी रूपये १५ हजार याप्रमाणे अग्रीम रक्‍कम देण्‍यात येईल, तसेच ज्‍या कर्मचा-यांना एम.टी.एन.एल.मध्‍ये काम करायचे नसेल त्‍यांना अन्‍य आस्‍थापनांमध्‍ये पाठवण्‍यात येईल, या महत्‍वाच्‍या ३ मागण्‍या मान्‍य करण्‍यात आल्‍या. 
याप्रसंगी महासंघाचे उपाध्‍यक्ष शिवप्रसाद भामरे, देवा कदम, दिपक काळींगण, खजिनदार मिलिंद पंडित, चिटणीस संतोष बामणे, विजय परब, सचिन कदम, निलेश बुरुणकर आदी पदाधिकारी व असंख्‍य कार्यकर्ते उपस्थित होते. महासंघाच्‍या पहिल्‍याच आंदोलनाला अभुतपूर्व यश मिळाले असून सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी सुदर्शन मोरे, प्रदीप रावराणे, प्रमोद पवार यांनी सर्वांचे आभार व्‍यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here