मुंबई प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी निमित्त आयोजित अल्पोपहार कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुंबई काँग्रेसचे सचिव प्रशांत प्रभाकर धुमाळ यांनी इमारतीतील रहिवासी आणि राजकीय सहकाऱ्यांसाठी हा स्नेहमेळावा आयोजित केला होता.
या कार्यक्रमास माहीम विधानसभेचे आमदार सन्माननीय महेश सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजन भोसले, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण सावंत, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे माजी विश्वस्त प्रवीण नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माहीम विधानसभा अध्यक्ष मोरेश्वर मोहिते आदी मान्यवरांनी हजेरी लावली.
तसेच मुंबई काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये रोशना शहा, धनंजय खाटपे, संजय भगत, मिलिंद केसरकर, संतोष गुप्ता, दीपक वाघमारे, हेमंत राऊत, निक्सन अंचन, चंद्रशेखर धुरू, घनश्याम राऊत, विजय शेळके, चारुशीला भिलारे, उत्तर भारतीय प्रकोष्ठाचे अध्यक्ष विकास शुक्ला, तसेच प्रकाश भिलारे, भूषण नागवेकर, वासुदेव घंटलोट, सचिन भोसले, लुसी व निकिता नाझरेथ, अमर माहिमकर, बाबर खान, शेरखान, अनिल मिश्रा आणि पूनम तिवारी यांचा विशेष सहभाग होता.
प्रशांत धुमाळ यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि हा प्रकाश आपल्या मैत्री, ऐक्य आणि स्नेहातूनच अधिक उजळतो. मान्यवरांनी दिलेला प्रतिसाद व प्रेम हीच आमची खरी संपत्ती आहे.”
कार्यक्रमाला स्थानिक रहिवाशांनाही मोठी उपस्थिती लाभली. उत्साह, स्नेह आणि दिवाळीच्या मंगल वातावरणात आयोजित हा स्नेहमेळावा एकतेचे सुंदर उदाहरण ठरला.








