Home ब्रेकिंग बातम्या ज्येष्ठ नागरिक संघांच्या स्थापनेतील पुढाकारामुळे  ज्येष्ठांना आधार मिळाला –  पत्रकार चंद्रशेखर दाभोळकर

ज्येष्ठ नागरिक संघांच्या स्थापनेतील पुढाकारामुळे  ज्येष्ठांना आधार मिळाला –  पत्रकार चंद्रशेखर दाभोळकर

0




ज्येष्ठ नागरिकांनी स्थापन केलेल्या ज्येष्ठ नागरिक संघांमुळे ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळाला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव व मार्गदर्शनाचा समाजाला खूप उपयोग होतो” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दाभोळकर यांनी केले.पूर्व उपनगरातील भांडुप पश्चिम येथील  उषा कॉम्प्लेक्स ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दि.१ ऑक्टोबरच्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित  साधून संकुलाच्या  नाना नानी पार्कातील विरंगुळा केंद्रात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून  बोलत होते.  संगीतोपचार तज्ञ किशोर गोलतकर , भांडुप पोलिस स्टेशनच्या महिला पो.उप निरीक्षक भीमा गवळी  ,नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन घारे हेही याप्रसंगी उपस्थित होते.दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्मृतीभ्रंश या रोगावर सांगीतिक उपचार कसे करावे याबाबत गोलतकर यांनी माहिती दिली तर श्रीमती गवळी यांनी पेन्शनर्सनी फ्रॉड कॉल्स आल्यास ज्येष्ठ नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी तसेच समारंभास जाताना दागिन्यांची कशी काळजी घेऊन गुन्हेगारी रोखावी  याबद्दल सांगितले.उपाध्यक्ष जनार्दन कदम, यशवंत पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.तुकाराम डोके यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला.उत्तम धुरी यांनी आभारप्रदर्शन केले तर अशोक गावडे,नयना खोत आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here