Home ब्रेकिंग बातम्या दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणुकीत मत चोरीचा आरोप, माजी संचालक विष्णू...

दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणुकीत मत चोरीचा आरोप, माजी संचालक विष्णू घुमरे

0



मुंबई प्रतिनिधी:
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५-२०३० च्या मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आणि माजी संचालक विष्णू घुमरे यांनी केला आहे. पगारदार नोकरांची आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असलेल्या या निवडणुकीत मत चोरीसारखा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक ५८ वरील कर्मचाऱ्यांकडून मतांची चोरी झाल्याचा आरोप करत उमेदवारांनी पुरावे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे सादर केले आहेत. उमेदवारांचा आरोप आहे की निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे सहयोगी यांनी मतमोजणी चुकीच्या पद्धतीने केली. जय सहकार पॅनलसह सर्व उमेदवारांनी ही मतमोजणी उच्च न्यायालयाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली पुन्हा पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने करावी अशी मागणी केली आहे. आम्ही कायदेशीर पद्धतीने जात आहोत.  आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय  मिळेल अशी आम्हाला आशा असल्याची माहिती दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव बँकचे माजी संचालक आणि जय सहकार पॅनलचे उमेदवार विष्णू घुमरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here