मुंबई प्रतिनिधी
श्री स्वामीनारायण मंदिर आचार्य श्री जितेंद्र प्रिय दाजी स्वामीजी महाराज यांच्या आशीर्वादाने महंत श्री दिवेदर्शन दाजी स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण मंदिर चे जनसंपर्क अधिकारी उदय लाड यांनी विभागातील गोरगरीब जनतेला मोफत धान्य वाटप केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांमध्ये 500 पेक्षा जास्त नागरिकांनी आवर्जून उपस्थिती राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आम्ही नियमित सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. गोरगरिबांना धान्य मिळावे आणि त्यांचा उदरनिर्वाह या उद्देशाने आम्ही हे मोफत धान्य वितरित केले असून यापुढे देखील अनेक धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करत राहणार असल्याची माहिती समाजसेवक उदय लाड यांनी दिली.








