परिवर्तन इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष, समाजसेवक संतोष पांडे यांचा जांभोरी मैदान, वरळी येथे दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या दहीहंडी महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित राहून ही मनाची दहीहंडी फोडली.








