मुंबई प्रतिनिधी
बकरी ईद निमित्ताने नागरिकांना सर्व सोयी सुविधा पुरवाव्या याबाबत इ वॉर्ड महापालिका कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बकरी ईद निमित्ताने महानगर पालिकेच्या वतीने सर्व सुख-सोई योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच परिसरात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली.तसेच परिसर स्वच्छता आणि धूर फवारणी करणे संदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त ई विभाग त्याचप्रमाणे अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर बैठकीत विविध मागण्याचे निवेदन मा. सहाय्यक आयुक्त महोदयांकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच निवेदन दिल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी सविस्तर विषयावर चर्चा केली. यावेळी सोबत विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभाग प्रमुख राम सावंत, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, सहसंघटक, माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील, सहसंघटक हेमंत कदम, शाखा प्रमुख सर्वश्री काका चव्हाण, रमेश रावल, लिंगाप्पा चलवादी, सलीम शेख व इतर पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे गजाला आपा आणि शबनम आपा, मेहबूब शेख व पदाधिकारी उपस्थित होते.








