Home ब्रेकिंग बातम्या गिरगाव येथे शिवसेनेचा गुढीपाडवा जल्लोषात

गिरगाव येथे शिवसेनेचा गुढीपाडवा जल्लोषात

0


मुंबई प्रतिनिधी: शिवसेना कुलाबा विधानसभा महिला संघटक सौ. समीक्षा पियुष पोफळे यांच्या वतीने आयोजित गुढीपाडवा स्वागत कक्ष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात  जल्लोषात पार पडला. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात चित्ररथाने उपस्थित नागरिकांची मने जिंकली. या कार्यक्रमांमध्ये ढोल पथकाने आपल्या अप्रतिम अशा ढोल वाजवून नववर्षाची शोभायात्रा सुरुवात केली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना *नेत्या श्रीमती मीनाताई कांबळी* उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते गुढी उभारून गुढीपाडव्याच्या शुभारंभाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून बेस्ट समिती अध्यक्षा सौ. तृष्णाताई विश्वासराव, फिल्म अभिनेत्री लीजा सिंग, मराठी चित्रपट अभिनेता चंद्रकांत मोरे, उपनेते व माजी नगरसेवक सुनील भाऊ नरसाळे, माजी नगरसेवक प्रमोद मांद्रेकर, तसेच माजी नगरसेवक व कुलाबा विधानसभा विभाग प्रमुख गणेशजी सानप तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत नववर्षाचे स्वागत आनंदात केले. कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here