Home ब्रेकिंग बातम्या कामा आणि अल्बलेस रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राने वंध्यत्व उपचारांमध्ये केले महत्त्वपूर्ण काम

कामा आणि अल्बलेस रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राने वंध्यत्व उपचारांमध्ये केले महत्त्वपूर्ण काम

0

मुंबई प्रतिनिधी

कामा आणि अल्बलेस रुग्णालयातील आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणा) केंद्राने जानेवारी २०२५ ते ११ जून २०२५ पर्यंत वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या केंद्रात ३७९ नवीन रुग्णांची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) नोंदणी झाली आहे, ज्यात ३५ जोडप्यांनी आययूआय (इन्ट्रायूटेरिन इन्सेमिनेशन) उपचार घेतले आहेत. यामध्ये ९ रुग्णांच्या युरिन प्रेग्नन्सी टेस्ट (UPT) पॉझिटिव्ह आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

डॉ. तुषार पालवे हे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ आणि ivf केंद्रप्रमुख आहेत . त्या सोबतच ते कामा रुग्णालयाच्या अधिक्षक या पदावर आहेत . त्यांच्या शब्दात “आयव्हीएफ उपचार महागडे असल्याने सामान्य लोकांसाठी ते परवडणारे नसतात. मात्र, आमच्या केंद्रामुळे गरिब आणि मध्यमवर्गीय जोडप्यांना सवलतीच्या दरात उच्च दर्जाचे उपचार मिळत आहेत.”

कामा रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्र हे महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयातील पहिले केंद्र आहे, जेथे वंध्यत्वावर सवलतीच्या दरात उपचार दिले जातात. येथे येणाऱ्या जोडप्यांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या सेवांचा लाभ घेता येतो.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज २० ते ३० जोडपी वंध्यत्व उपचारासाठी रुग्णालयात येतात. आयव्हीएफ उपचारांच्या दुसऱ्या टप्प्यात ८० जोडप्यांनी नोंदणी केली आहे. या यशस्वी उपचारामुळे अनेक जोडप्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आले आहेत.

कामा रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या जोडप्यांना आशेचा किरण मिळाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे सामान्य लोकांसाठी उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here