Home ब्रेकिंग बातम्या चंदगड मतदार संघात एसटी बसेस वाढवा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

चंदगड मतदार संघात एसटी बसेस वाढवा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

0


मुंबई प्रतिनिधी
चंदगड मतदारसंघाला लागूनच कर्नाटक आणि गोवा राज्य असून या भागात सर्वसामान्य लोकांना दळणवळणासाठी उपलब्ध असणारी हक्काची सेवा देणारी’लालपरी’ म्हणजे ‘एस टी बस. एसटी बसेस ची आमच्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.  चंदगडमधील बहुतांशी जनता, शाळकरी मुले हे एस. टी. सेवेवरच अवलंबून आहेत. पण आगाराकडे एस. टी. बसेसची परंतु एस टी बसेसची कमतरता असल्याने सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. वेळेवर एस. टी. बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. याबाबत नुकतीच मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची भेट घेवून त्यांच्याजवळ मतदारसंघातील अपुऱ्या बससेवेमुळे होत असलेल्या जनतेच्या गैरसोयीची व्यथा मांडली आणि लवकरात लवकर चंदगड आगाराला आणखी नव्या बसेस मिळाव्यात यासाठी विनंती केली. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी माजी मागणी मान्य केली असून लवकरच मतदार संघात एसटी बसेसची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here