Home राजकीय *रिपब्लिकन पक्ष काढणार देशभरात भारत जिंदाबाद यात्रा ~ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...

*रिपब्लिकन पक्ष काढणार देशभरात भारत जिंदाबाद यात्रा ~ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

0



मुंबई प्रतिनिधी~ जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून 28 जणांची क्रूर हत्या केली.या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिन्दुर ऑपरेशन करून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या प्रमाणे नेमके हेरून दहशतवादी ठिकाणे उध्वस्त केली. दहशतवाद्यांना धडा शिकवला.भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवून देशाचे संरक्षण करून शत्रू राष्ट्र पाकिस्तान ला चांगलाच धडा शिकवला.भारताचे दहशतवादाविरुद्ध युद्ध कायम राहील . भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारी ; दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या सिन्दुर ऑपरेशनच्या यशाबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर
भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

येत्या दि.22 मे ते 6 जून पर्यंत देशभरात सर्व राज्यांत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात रिपब्लिकन पक्ष भारत जिंदाबाद यात्रा हाती तिरंगा ध्वज घेऊन काढण्यात येणार आहे. याबाबत या भारत जिंदाबाद यात्रेला कुठे उशीर झाला नाही ना असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता हो नक्कीच या भारत जिंदाबाद यात्रेला थोडासा उशीर झाला आहे परंतु भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच देशाचा अभिमान बाळगण्यासाठी या भारत जिंदाबाद यात्रेचे आम्ही आयोजन करत असल्याची माहिती आठवले यांनी यावेळी दिली. यावेळी रिपब्लिक पक्षाचे माजी मंत्री अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, शिरीष चिखलकर, विशाल दिवार आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here