Home मनोरंजन आर पी आय तर्फे होणार कॅरम स्पर्धा

आर पी आय तर्फे होणार कॅरम स्पर्धा

0



मुंबई प्रतिनिधी
आर पी आय तर्फे (आठवले) कुलाबा तालुका आणि दक्षिण मुंबई जिल्हा यांच्यावतीने दिनांक २४ ते २५ मे रोजी सीएसटी येथील केंद्रीय कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भव्य कॅरम स्पर्धा होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी दिली.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रति स्पर्धेकांना या स्पर्धेकरीता प्रवेश शुल्क ५०० रुपये आकरण्यात आले आहे. उपांत्य फेरीपासून पहिल्या ब्रेक टू फिनिशसाठी ५०१ रुपयांचे व पहिला ब्लॅक टू फिनिशसाठी ५०१ रुपयांचे विशेष पारितोषिक स्पर्धेकांना जिंकता येणार आहे. या स्पर्धेत ६ बॉर्डचे तीन सामने खेळविण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धेकांसाठी कॅरम स्पर्धेचे नियम व अटी प्रवेश अर्जावर नमूद केल्या आहेत. स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंच म्हणून संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी शिरीष चिखलकर यांना ९८९२४५३२१० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पदाधिकारी विजय जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here