Home ब्रेकिंग बातम्या
0

पत्रकार आणि शासनातील दुवा संजय महाले झाले निवृत्त

केतन खेडेकर:

पत्रकारांना गेल्या अनेक वर्षांपासून अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेऊन वावरणारे, नियमाप्रमाणे वागणारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी श्री. संजय महाले हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. विशेष म्हणजे त्यांचा गुरुवारी वाढदिवस होता. याचे औचित्य साधून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकार कक्षात त्यांना सन्मानित करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. यावेळी संघाचे माजी अध्यक्ष मंदार पारकर, प्रमोद डोईफोडे, कार्यकारिणी सदस्य राजन शेलार, खंडूराज गायकवाड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here