Home ब्रेकिंग बातम्या *जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची रविवारी सांगता ; प्रतिष्ठेचे पुरस्कार गोपाळ शेट्टी...

*जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची रविवारी सांगता ; प्रतिष्ठेचे पुरस्कार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते होणार प्रदान    

0

  मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पूर्व येथील गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सांगता होत असून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, जय महाराष्ट्र नगराचे भाग्यविधाते विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे गेल्या शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ पासून आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेला पहिला विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक संजय डहाळे यांना, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांना,  प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लबच्या आधारस्तंभ सौ. पल्लवी राकेश वायंगणकर यांना, जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते विजय पडकिल यांना माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे, श्रेयसी मंत्रवादी, अर्चना गोरे  यांच्या ‘कितीदा नव्याने …’ या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम होणार आहे. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व मुंबई येथे सायंकाळी साडेसात वाजतां होणाऱ्या या कार्यक्रमाने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here