केतन खेडेकर: विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात बुध्द जयंती, कामगार व महाराष्ट्र दिन संयुक्तपणे उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईचा महाराष्ट्र मिळण्यासाठी 106 होतात म्हणून आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आणि हुतात्मे पत्करला त्यामुळे ही मुंबई सहा महाराष्ट्र झाला आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. आज महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात खूप आक्रमण होत आहे. त्या आक्रमणाला आपल्याला वेळीच रोखायचे आहे आणि प्रगत महाराष्ट्र घडवायचा आहे जाहीर प्रतिपादन प्रभात मंडळाचे सचिव , ज्येष्ठ पत्रकार नचिकेत पानसरे यांनी केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड, खजिनदार गौतम डांगळे, उपसचिव श्रध्दानंद निकम, संजय मयेकर, विलास देशनेहरे, सी. के. सर्वगोड, बबन देशनेहरे, सुरेश नलावडे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रभात समयी मंडळाच्या गायकांनी बुध्द व भिम व महाराष्ट्र गीते गाऊन वातावरण प्रफुल्लित केले होते. विवेक गायकवाड, सी. के. सर्वगोड, संजय मयेकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.








