Home ब्रेकिंग बातम्या काळाचौकी येथे नूतनीकरण झालेल्या एस टी बस थांबाचे झाले लोकार्पण

काळाचौकी येथे नूतनीकरण झालेल्या एस टी बस थांबाचे झाले लोकार्पण

0


मुंबई प्रतिनिधी
दक्षिण मुंबईत श्रावण यशवंते चौक, काळाचौकी येथे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या विकास निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘प्रसिद्ध कबड्डीपटू कै. मधु पाटील स्मरणार्थ एसटी बस थांब्या’चा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रवाशांना आणि सामान्य जनतेला प्रवासादरम्यान हक्काची आणि सोयी-सुविधांनी युक्त जागा मिळावी, या उद्देशाने या सुसज्ज बसथांब्याची निर्मिती करण्यात आली.
विशेष म्हणजे, मुंबई सेंट्रल बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे, एसटी वाहक मनोज माळूजकर आणि चालक अमोल मोरे यांच्या शुभहस्ते ह्या नूतनीकरण केलेल्या बसथांब्याचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून हा बस तांब्याचे नूतनीकरण होणे फार गरजेचे होते. तसेच या ठिकाणी बसायला देखील एसटी प्रवाशांना जागा नव्हती.  त्यामुळे आता सुसज्ज असा हा थांबा नूतनीकरण झाला आहे. आता एसटी प्रवाशांना या बस थांबा मध्ये मुबलक जागा बसण्यासाठी उपलब्ध झालीने. तसेच या ठिकाणी संपूर्ण लाईटची आणि पंख्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी आम्ही लवकरच एक पाण्याचा कुलर लावणार आहे जेणेकरून प्रवाशांना थंड पाणी मिळेल अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणातून दिली.  हा सुसज्ज असा एस टी थांबा  बनवल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी खासदार अरविंद सावंत यांचे मनापासून आभार मानले.
या सोहळ्याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक रमाकांत रहाटे, भायखळा विधानसभा महिला प्रमुख सौ. सुरेखा राऊत, महिला विधानसभा संघटक सौ. चंदना साळुंखे, महिला उपविभाग संघटिका सौ. किर्ती शिंदे, सहसंघटक रविंद्र चव्हाण, शाखाप्रमुख रमेश रावल आणि महिला शाखासंघटिका सौ. अंजना औटी तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, कार्यालय सचिव गंगाधर चंद्रमोरे, उत्तम सावंत, विनायक सैतवडकर आणि श्री सिद्धी गणेश सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश अपराध, खजिनदार नंदा राम पारखे, सदस्य सुरेश चव्हाण यांच्यासह स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here