केतन खेडेकर
वरळी येथील एन एस सी आय क्लबच्या गैरव्यवहार प्रकरणी शासनाने त्वरित चौकशी करून कायदेशी कारवाई करावी अशी मागणी आमदार सुनिल शिंदे यांनी अधिवेशनात केली.
RG/PG पॉलिसीनुसार मंजूर बांधकामाच्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे. याची सविस्तर चौकशी करण्यात यावी.तसेच NSCI क्लबकडून मुंबई महानगरपालिकेला देय असलेली अंदाजे ७० ते ७५ कोटी रुपयांची रक्कम कोणत्या निकषांवर माफ करण्यात आली, याची चौकशी करा. त्याचप्रमाणे
NSCI क्लबला परवानगी देताना स्थानिक नागरिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली होती. त्या अनुषंगाने आजपर्यंत किती स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात आले. तसेच ७० ते ७५ कोटी रुपयांची थकबाकी असतानाही NSCI क्लबला सवलतीच्या दरात पाणी व वीज पुरवठा का ? आणि कशाच्या आधारे दिला जात आहे. तसेच
NSCI क्लब परिसरात उभारण्यात आलेल्या खाजगी थिएटरमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नसल्याची तक्रार आहे. तसेच, येथे उपलब्ध असलेल्या प्रशस्त हॉलमध्ये दरमहा २ ते ३ दिवस महानगरपालिका किंवा सामाजिक संस्थांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची अट असताना ती पाळली जात नसल्याची बाब गंभीर आहे. त्याच प्रमाणे NSCI क्लबला आधीपासून पुरेसा पाणीपुरवठा असतानाही अनधिकृत पाण्याच्या लाईन्स घेतल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कोविड काळात घेतलेल्या अतिरिक्त पाणी व वीज लाईन्स अजूनही तश्याच आहेत व त्याचा मुबलक व मोफत वापर हा क्लब करतो आहे. शासनाने याबाबत स्वतंत्र चौकशी करून सविस्तर लेखी अहवाल सादर करावा. तसेच, स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटाने स्थानिक आमदारांच्या तक्रारी अधिकृतरीत्या नोंदवून त्यावर तातडीने कारवाई करावी.अशी मागणी शिंदे यांनी आज अधिवेशनात केली.








