Home ब्रेकिंग बातम्या कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील अडथळा अखेर दूर; आमदार अतुल भोसले यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी

कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील अडथळा अखेर दूर; आमदार अतुल भोसले यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी

0

घारेवाडी (ता. कराड) : कराड-ढेबेवाडी रस्त्यावर घारेवाडी येथे रस्त्याच्या मध्यभागी येणारे घर अनेक वर्षांपासून वाहतुकीस अडथळा ठरत होते. या ठिकाणी अनेक अपघात झाले असून काही दुर्घटनांत जीवितहानीही झाली होती. सदरचा विषय मागील दहा वर्षांपासून प्रलंबित होता.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या पुढाकाराने आणि सततच्या पाठपुराव्याने संबंधित कुटुंबाची समजूत काढण्यात आली. कुटुंबीयांनी समंजस भूमिका घेत सहकार्य केले आणि अखेर आज सदरचे घर जमीनदोस्त करण्यात आले.

रस्ता आता वाहतुकीस मोकळा झाला असून, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षे रखडलेल्या या प्रश्नाची सोडवणूक आमदार अतुल भोसले यांच्या सक्रिय पुढाकारामुळे शक्य झाली, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

यापुढे रस्त्यावरील अपघात टळतील आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here