Home ब्रेकिंग बातम्या एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड नाव नोंदणी शिबिर ; सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचा...

एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड नाव नोंदणी शिबिर ; सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम.          

0

  मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी डेपोत जाऊन एसटी महामंडळाचे  नवीन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अनेक अडचणी येतात. म्हणून सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तसेच सानपाडा येथील भारत ई सेवा केंद्र आणि कामोठे येथील थोरात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) स्मार्ट कार्ड नांव नोंदणी शिबिर नुकतेच संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या शिबिरामध्ये १६० ज्येष्ठ नागरिकांच्या स्मार्ट कार्डची नांव नोंदणी करण्यात आली. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सानपाडा  विभागातील नगरसेवक श्री. भाऊ भापकर, श्री. सुनील कुरकुटे, सौ. शैला पाटील आणि सौ. शिल्पा ठाकूर यांनी उपस्थित राहून या शिबिराला शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नागरिक सभासदांसाठी एसटी महामंडळाला भराव्या लागणाऱ्या रकमेचा आर्थिक भार उचलण्यासाठी पुढाकार घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी थोरात फाउंडेशनचे संचालक  कैलास थोरात, संजीव मोरे,  भारत ई सेवा केंद्राच्या संचालिका सौ. विजया सतीश विश्वासराव, संघाचे पदाधिकारी सर्वश्री जगदीश एकावडे, महादेव पाटील, लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, राजेंद्र कदम, जे.पी. देसाई, अमोल शेजाळे, मंगला मानधना तसेच माजी पदाधिकारी विठ्ठल गव्हाणे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here