Home ब्रेकिंग बातम्या बॉस्को डिसोझा यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर

बॉस्को डिसोझा यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर

0



मुंबई प्रतिनिधी: व्यसन उपचार व प्रतिबंध क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. बॉस्को मायकल डिसोझा यांना शासनाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२४-२०२५’ जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार दि. २६ मार्च २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. डिसोझा यांनी गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळ व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करत हजारो व्यसनाधीन व्यक्तींना नवे जीवन दिले आहे. पुनर्वसन, जनजागृती, प्रशिक्षण आणि संशोधन या सर्व स्तरांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, देशभरात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पोलीस, विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये ते नियमितपणे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहेत.

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना श्री. बॉस्को मायकल डिसोझा यांनी ‘नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य’च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि चिटणीस अमोल स.भा. मडामे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे व्यसनमुक्ती चळवळ अधिक प्रभावीपणे राबवता आली, असे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here