मुंबई प्रतिनिधी
कफ परेड येथील नामवंत अशा जीडी सोमानी इंटरनॅशनल शाळेमध्ये आज कामगार नेते किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची राष्ट्रीय कर्मचारी सेनेची स्थापना करण्यात आली. जेडी सोमानी शाळेतील अनेक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जसे की त्यांचे पीएफ , ग्रॅच्युईटी, बोनस यासारखे विविध प्रश्न प्रलंबित होते. याबाबत कामगार नेते किरण पावसकर आणि येथील स्थानिक विभाग प्रमुख दिलीप नाईक यांचे नेतृत्वाखाली जीडी सोमानी शाळेच्या व्यवस्थापना बरोबर सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये व्यवस्थापनाने कामगारांचे पीएफ ग्रॅच्युईटी बोनस यासारखे विविध प्रश्न त्वरित सोडवण्यात येतील. तसेच एखादा कर्मचारी जर निवृत्त होत असेल तर त्याला एक महिने आधी नोटीस दिली जाईल जेणेकरून त्याच्या सर्व देणे व्यवस्थापनाला देता येतील. या सकारात्मक गोष्टी घडल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे मनापासून आभार मानले. यावेळी कर्मचारी युनिटचे अध्यक्ष तुकाराम घुले, उपाध्यक्ष संतोष आरते,चिटणीस सुभाष कांबळे, उपचिटणीस सुनील जाधव, शिवसेनेचे शाखाप्रमुख निलेश भोईटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.








