Home ब्रेकिंग बातम्या जितेंद्र सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र  उपाध्यक्ष पदी निवड

जितेंद्र सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्र  उपाध्यक्ष पदी निवड

0


मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार तसेच कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री सहायता निधी मंगेश चिवटे  यांच्या मार्गदर्शनाने जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मुंबई महानगर कार्याध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत त्यांना आनंद आश्रम टेंभीनाका, ठाणे येथे पत्र देऊन पदभार देण्यात आला. सकपाळ यांचा तळागाळातील जनतेसोबत असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी दिली असल्याचे सांगितले जात आहे.
आम्ही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माध्यमातून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. तसेच अनेक रुग्णांचे मोठे ऑपरेशन अगदी माफक दरात केलेले आहेत. तर ज्या रुग्णांकडे गंभीर आजारांचे  ऑपरेशन करण्यासाठी पैसे नाहीत अशा  रुग्णांच्या मोठ्या आजारांवर देखील आम्ही त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केलेली असून काहीं ठिकाणी आम्ही मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या आहेत.   यापुढे देखील आम्ही रुग्णांसाठी वैद्यकीय कक्षांच्या माध्यमातून अनेक शिबिरे घेऊन त्यांचे रोगाचे निधन करणार असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय पक्षाचे उपाध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांनी दिली.
त्याप्रसंगी वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रामहरी राऊत,कक्ष प्रमुख पनवेल विधानसभा शिवसेना वैधकीय मदत कक्ष व धर्मवीर वाहतूक सेना-उपाध्यक्ष सुखदेव सस्ते,अखिल भारतीय केबल सेनेचे अध्यक्ष टोनी डिसोझा,शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष उपाध्यक्ष पंढरी पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here